www.engoi.com काय आहे?

इथे शब्द कसे शिकले जातात?

इथे ध्वनी कसे काम करतो?

मी प्रवेश करु शकत नाही

www.engoi.com अजुन चांगली कशी होइल?

मला पडलेला प्रश्न किंवा शंका इथे लिहिलेली नाही!

जाता-जाता.........

www.engoi.com काय आहे?

www.engoi.com आपल्याला वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी मदत करणारी एक अनोखी वेब-साइट आहे. आपण आपली भाषा व आपल्याला शिकयची भाषा निवडून ,त्या भाषेतील शब्द-सूची निवडू शकता. www.engoi.com च्या सहाय्याने शब्दसंग्रहही उत्तम प्रकारे वाढवू शकता.

इथे शब्द कसे शिकले जातात?

इथे ध्वनी कसे काम करतो?

आता आपण शिकत असलेल्या भाषेतील शब्द आणी वाक्ये यांचे ध्वनीमुद्रिकरण आपण ऐकू शकाल. आम्ही एकेका भाषेचे ध्वनीमुद्रिकरण करत आहोत, यासाठी जे ही भाषा बोलतात त्यांची मदत घेत आहोत. पुढे दिलेल्या भाषा ह्या आम्ही आत्तापर्यंत ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत.

हा ऒडियो प्लेयर आहे. एखादे पान उघडल्यावर त्यातून आवाज येतील. पुन्हा ऐकण्यासाठी त्यावर क्लिक करा.

ध्वनी ऐकण्यासाठी Flash 8 किंवा त्यापूढील अव्रुत्ती आपल्या कॊंम्प्युटमध्ये बसवून घ्या.

मी प्रवेश करु शकत नाही

जर आपण पासवर्ड विसरला असाल, तर विसरलेल्या पासवर्डसाठी असलेले पान वापरुन नवा मिळवा.

बरोबर username व पासवर्ड वापरुनही जर आपण प्रवेश करु शकत नसाल तर, कदाचित आपला ब्राउजर www.engoi.com च्या कुकीजना परवाना देत नसेल. तशी परवानगी देणे आवश्यक आहे.

ह्या साईटवर काही शब्द फक्त इंग्रजी का आहेत?

दरवेळी जेव्हा आम्ही ह्या साईटवर नवनवीन गोष्टी आंतर्भूत करतो, त्या गोष्टी आम्ही भाषांतरीत करतो. कधीतरी ह्या गोष्टी लगेचच आंतर्भूत केल्या जातात, तर कधीतरी वेळेअभावी त्या पूढे ढकलल्या जातात.

www.engoi.com अजुन चांगली कशी होइल?

आज जे आहे ते छान आहे. परंतू यात अजुनही नवनवीन गोष्टी सामील करता येतील, जसे अनेक शब्द आणी वाक्प्रचार, त्याचबरोबर अनेक युक्त्या, ज्यामुळे भाषा शिकणे हा आपल्यासाठी एक अतिशय परिपूर्ण असा अनुभव होइल.आम्ही ते करुच, फक्त थोडा वेळ लागेल.(आत्ताच खूप काही बोलण्यापेक्शा करुन दाखवीणे कधीही उत्तम, नाही का?)

ह्या सर्व गोष्टीना थोडे परिश्रम लागतात म्हणुनच ही साइट पूर्णपणे विनामुल्य नाही. अर्थप्राप्तीसाठी आम्ही काही जाहीराती आमच्या साइटवर लावणार आहोत. ज्यामुळे अर्थप्राप्तीबरोबरच वेब-साइट सुधारणेच्या कामातही हातभार लागेल.

मला पडलेला प्रश्न किंवा शंका इथे लिहिलेली नाही!

आम्हाला लिहिण्यासाठी ह्या पानाच्या शेवटी असलेला फोर्म भरा.जर आपण सभासद असाल, तर आपले username लिहा. क्रुपा करुन मेल इंग्रजीमध्ये लिहा. जर असे नसेल, तर आम्हाला आपल्याला उत्तर पाठवायला वेळ लागू शकतो, कारण जरी ही एक बहुभाषीक वेब-साइट असली ,तरी आम्ही सर्वजण आपली मत्रुभाषा जाणतच असू अशी शक्यता कमीच आहे! तरीही आपल्याला सर्वतोपरी मदत करण्याची आम्ही हमी देतो.

जाता-जाता.........

भाषा शिकणे एक मजेशीर अनुभव तर आहेच पण एक आव्हानही आहे.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शब्द संपदा वाढवणे.जितके जास्त शब्द,तितकी जास्त मज्जा आणी तेवढेच जास्त तुमचे यश.engoi.com आपल्याला शब्द संपदा वढविण्यासाठी मदत करते.

अभ्यासासाठी आमच्या हार्दिक शुभेछा,

Daniel

www.engoi.com